प्रतिनिधी : जुनैद अहेमद 

मुंबई, दि. ४ जून २०२५: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. उद्यापासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार-लिंक बँक खात्यात हा निधी जमा होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती एस. तटकरे यांनी दिली.

महायुती सरकारच्या दृढ निश्चयाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. "महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास आणि सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही सुरू राहील," असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सन्मान निधी देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. लाभार्थ्यांना वेळेवर निधी मिळावा यासाठी तांत्रिक प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.